कृतीहीन बंदी ........
अश्रू भिजल्या कॅनव्हासवर ,
ते हिलस्टेशन रंगवत होते,
आम्ही कॅनव्हास कोरडे केले
,
बिचारे आमच्याचसाठी राबत होते
......
तोच स्टुडिओ,तेच रंग,
कलाकार बदलत होते,
पांढरा स्वच्छ ब्रश वापरत,
काळी सत्य दडवत
होते .........
प्रत्येक चित्राला एकच नाव
,
नव्या युगाची नांदी,
हतबलतेच्या
गजाआड,
आम्ही कृतीहीन बंदी,
आम्ही कृतीहीन बंदी..........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा