शनिवार, २३ मार्च, २०१३

..... माझ्या मेंदुच झालंय भजं रे ....होलयो ....................................................

..... माझ्या मेंदुच झालंय भजं रे ....होलयो ....................................................
युं तो मै सिगरेट नही पिता ,
लेकिन आनेवाले हर आदमी के पास माचिस जरूर मांगता हूं I
बहुतसी चीजे है जिन्हे फुंकना चाहता हूं I
लेकिन हिम्मत नही होती ........
         
लेकिन हिम्मत नही होती ........
आपल्या भारदस्त आवाजात गुलजार बोलत होते . देवडी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगिची त्यांची मुलाखत. मी पुन्हा पुन्हा पाहत होतो. शब्दांच्या जादुगाराचे गारुड. होळी जवळ आलेली असताना ह्या ओळी कानावर याव्यात, कुठेतरी विचारांशी सांगड घालत पुन्हा पुन्हा गुलजार समोर येत होते.                                                        
        '
होळी' समाजातल्या असद्प्रवृत्ती भस्मसात करून त्या प्रवृत्ती विरुद्ध शिमगा करण्याचा सण पण फक्त प्रतिकात्मक ,कारण एकच ' हिम्मत नही होती '........
         
होळीच्या भोवती एकत्र जमून बोंबा मारत अनिष्टांचे प्रतिकात्मक दहन करणाऱ्या हातांनी प्रत्यक्षात अनिष्टांचे दहन होईल

         
पुन्हा एकदा समोर आली एक 'ग्रेट भेट'. आपल्या फार्म हाउसवर मोकळेपणी निखिल सरांशी गप्पा मारणारा नाना भावनाविवश होत सांगत होता : वणवा येणार , येणार म्हणजे काय ? येणारच  पुढे उगवणाऱ्या हिरवळीसाठी हा वणवा  येणे क्रमप्राप्त आहे . आपण साक्षीदार असू त्याचे ........
          '
खरच जमीन इतकी तापलीय ?' सारच बदललय , बदलतय ........
        

 लहानपणी - किलोमिटर चालत जायचो होळीला, आता का वाटत नाही ?
         
कॉलेजमध्ये असतानाचा एक किस्सा आठवला. मी,बंड्या,अनिल युयुत्सु आम्ही एका वर्षी होळीच्या रात्री दुकानांच्या  नावाच्या पाट्या बदलल्या होत्या. भाजीच्या दुकानाला सलूनची पाटी, मेडीकलला कापड दुकानाची जमतील तशा जमतील तेव्हड्या ..दुसऱ्या दिवशी  खुप धमाल आली होती . पण आता कोणाच्या बदलणार ? ज्याचे किराणा मालाचे दुकान तोच बिल्डर ,त्याचेच मेडिकल,पैसा गुंतवायचा म्हणून त्याचेच हौटेल. जो तो स्वतःचे एम्पायर करण्यात गुंतलेला,पाट्यामागची माणसें तीच.
     
बरंच काही घोन्गावतय ..... चला बोंबा मारूया ...........................
              
मालवणी खाजं रे खाजं ..... माझ्या मेंदुच झालंय भजं रे ....होलयो................................................... 
                                                       

(ढोल वाजायला लागतील, फडकणाऱ्या नीशाणामागे देव पालखीत बसून येतील पावलांना आपल्याकडे वळवत...... )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा