छुप छुप कर
छुपाके
छुप
जाना
............
सुट्टीचा दिवस, बाहेर मुसळधार
पाऊस, अश्यावेळी करण्यासारख
काही असेल तर
एक म्हणजे गरम
गरम चहा आणि
एखाद पुस्तक. पण
नुकतंच भा. द
.खेर याचं राजहंस
प्रकाशनाच 'हसरे दु:ख' संपवलं
होत. चार्ली चाप्लीन,
एक स्वप्नाळू अजरामर
कलावंताचा जीवनपट उघडणारी व
जगाला हसवणाऱ्या कलाकाराची
दु:ख तेव्हड्याच
ताकदीने मांडणारी भा.
द .खेर यांची
अफाट कादंबरी. त्या
मनोरम्य घटनाक्रमांच्या उजळणीतून बाहेर पडवत
न्हवत जेव्हड संततधार
पावसामुळे .अर्थात मग दुसरा
पर्याय म्हणजेच टी.व्ही.
चालू केला. राजकीय
आरोप प्रत्यारोप, आत्महत्या,
तेच तेच रियालिटी
शो म्हणून म्युझिक
च्यानेल सुरु केल.
समोर तिघीजणी एका
सुरात पल्लू के
नीचे छुपाके रखा
है, म्हणत नाचत
होत्या. तो उत्तान
नाच चालू असताना
च्यानेल बदलल अर्थात
तेही म्युझिक च्यानेल
होत व त्यावर
रफी साहेबांच्या स्वर्गीय
सुरात
छुपने वाले सामने
आ..
छुप छुप के
मेरा जी न
जला..
सूरज से किरन
बादल से पवन…
कब तलक छुपेगी
ये तो बता…
ह्या गाण्यावर
शम्मी कपूर
लडिवाळ छेडछाड
करत होते. गाण
संपल आणि मनात
आल छुपाना, छुप
जाना, छुपा लिया
ह्या शब्दांचा चित्रपट
गीतांमध्ये किती वेगवेगळ्या
प्रकारे उपयोग केला आहे.
पहिलं गीत आठवल ‘जवाब’ चित्रपटातील 'ए चांद
जरा छुप ना जाना ' १९४२ सालातील अप्रतिम गाण . ब्लैक एंड व्हाईट जमान्यातील १९५४ सालातील आणखी एक अप्रतिम लता दीदी व हेमंत कुमार
यांच्या आवाजातील ' शर्त ' चित्रपटातील ‘देखो ये चांद छुपाके क्या करता है इशारे शायद
ये कह रहा है हम हो गये तुम्हारे हे’ गाण
. त्यानंतर साधारण स्वीट ६० मधील
१) जरा सामने तो आओ
छ्लीये छुप छुप चलने में क्या राज है (जनम जनम के फेरे )
२) दिन छुप गया निकले
तारे (अंजान)
३) मन्नाडेचं मिस्टर
एक्स चित्रपटातील छुप छुप क्या करता बंदे ही गाणी आठवली.
गोल्डन ७० व ८० मधील
१) रफी साहेबांच ‘ए
चांद जरा छुप जा’ (लाट्साहब )
२) दुनिया छुप छुप
सी चोर ( एक थी रीटा)
३) सच्चाई छुप नही
सकती बनावट के उसुलोन्से यासारखी प्रणय गीतानबरोबरच वास्तवतेचे भान आणणारी गाणी समोर आली .
यानंतर '९०' मधील एक
अप्रतिम गाण जे बघता बघता डोळ्यात अलगद पाणी
कधी येत तेही न समजता पाहत रहाव अस 'जो मै छुप जाऊ कही नजर आऊ..बोलो धुन्डोगे कहा
... बोलो मम्मी बोलो पप्पा’ आठवल . त्याचबरोबर समोर येतात ,
१) बादलोमे छुप रहा
है चांद क्यू (फिर तेरी कहानी याद आई)
२) आ छुप जाये सनम
(बरसात कि एक रात)
ही सर्व गाणी
नजरे समोरून जाताना
मनात आल पल्लू
के नीचे सारखी
गाणी जी केवळ
बघण्यासाठीच चित्रित केली जाऊ
लागली तर गाण्यातील
शब्द हि कदाचित
लपून बसतील.
बर कितीही शोध घेतला
तरी अस गाव
सापडत नाही जिथे
चिकण्या चमेल्या नाचतात, जिथे
जिगरसे बिडी जळते.
ज्या गावात खुलेआम
बंदुकांच्या फैरी झडतात,
जिथे फक्त काठ्यांचा वापर
होतो, तिथे तुम्ही
अस काय लपवलय
की ते दाखवलं तर
ह्याहून अधिक हंगामा
होईल. एकदा काय
ते दाखवाच, बघूया
काय हंगामा होतो
ते .....
ता. क .- तकनिकी
खराबी के कारण
जब तक ये
बाते आप तक
पहुंचावू ऐसी नुज
आई है की
पल्लू का सिक्वेल
आ रहा है
, शायद उसमे वो
बात सामने आने
वाली है , यारो
थोडा इंतजार .................



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा