‘आरगाव श्री’ ते ‘पद्मश्री’
अस्तन्या सावरत रागारागाने बंड्या मोकाशी माझ्या घरात शिरला आणी माझ्या छातीत दुखायला सुरुवात झाली. बंड्या आमच्या ‘आरगावचा’ नावाजलेला पहिलवान. त्याने अस गुरगुरत घरात येण म्हणजे मोठी त्सुनामी येणच. मी दबकतच दरवाजा उघडुन त्याला आत घेतल आणी दबकतच येण्याचे कारण विचारल, ‘मन्या अखंड गावात तुझ्यासारखा हुशार कोण आहे? त्याने रागात विचारलेल्या या प्रष्णाच उत्तर काय द्याव या विचारात असताना त्याने पुन्हा विचारले‘गेली अनेक वर्षे आरगाव श्री कोण होतय? मीच ना?’ हे विचारत त्याने शर्टाची दोन बटने उघडी करुन तब्येत दाखवायला सुरुवात केली, अन मी आणखीनच घाबरलो.‘मन्या तुला ते इंटरनेट समजत ना? तुझ वाचनही भरपुर आहे, मग मला सांग हे ताज हॊटल कुठे आहे? साला आपण आता डेरींग करणारच’ एरवी कुस्ती शिवाय कधी गाव न सोडणारा बंड्या ताजची चौकशी का करतोय हे मला कळेना. मी असा वेगळ्या नजरेने बघतोय हे लक्शात येताच तो म्हणाला‘ मन्या फक्त पत्ता दे, आता त्या हटेलात जातो नी एका दोघांना लोळवतो मग बघतो कस देत नाहीत? काय बी करुन पेपरात बातमी आली पाहिजे आरगावच्या बंड्या मोकाश्याला पद्मश्री! काय?
ताज हॊटेलमध्ये जावुन एकादोघांना लोळवण्याचा आणि बंड्याच्या पद्मश्रीचा संबंध मला कळेना, मी तस त्याला विचारताच तो म्हणाला‘मन्या रात्री टी.व्ही.वर चर्चा चालली होती, एकतर त्यातल आपल्या खोपडीत काय जात नाय पण एव्हड कळल त्या नबाबाच्या मुलग्याने मागे एकदा कोणाला तरी मारल तर सरकारने म्हणे त्याला पद्मश्री दील. आता त्याने पुन्यांदा कोणाला तरी मारल आता आणखी मोठा पुरस्कार देणारे म्हणे.बंड्याच्या या वाक्याने आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आजपर्यंत ‘आरगावश्री’, ‘मुंबईश्री’ एव्हडच ऎकलेल्या बंड्याला पद्मश्री ही त्या पैकीच एक वाटत होती,व लंगोटीवर शरीराला पीळ देत पदवी मिळवण्यापेक्षा एका दोघांना हाणून मिळवणे त्याला सोपे वाटत होते.हा सगळा गोंधळ त्याला समजावुन सांगण्यासाठी मी तोंड ऊघडणार एव्हड्यात ‘मन्या सगळ्या प्रकरणाची पुर्ण माहिती काढुन ठेव मी उद्या सकाळी तालमीतुन थेट येतो’ अस गुरगुरत तो निघुन गेला.
दुसऱ्या दिवशी भर पहाटे बंड्या तालमीतुन थेट माझ्याकडे आला. मी चहा विचारताच लेका खुराक आणि दुध हाणुन आलोय सांगत खदा-खदा हसला. मग अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले,अन तो चक्क लाजला.‘ मन्या लेका पद्मश्रीचे दुसरे क्वॊलिफ़िकेशन आपण जवळ-जवळ मिळवले बघ’ आपण’ मी प्रष्ण करताच ‘येड्या आपण म्हणजे मी!हे बघ मी खुराक आणायला जातो त्या वाण्याच्या मुलीचे नाव काय? सांग,सांग’अमॄता’ मी उत्तर देताच माझ्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला‘ अन मला आवडते तिच? येड्या तुला सांगितलय ना?’ मी मानेनेच हो करत उत्तर दिले‘ रिना’. एकदम टाळी देत म्हणाला बघ नबाबाच अन आपल शेम करायच. मी पण अमॄताशी लग्न करतो, मग डिव्होर्स देतो अन रिनाशी इश्क चालु. हाय की नाय?’ मी अवाक होऊन बघु लागलो तर म्हणाला‘ दामुच्या सलुन मध्ये सारी न्युज मिळालेय. अरे तालमीन तर प्रेस्टीज पॊइंट केलाय काय? बर जाउ दे संध्याकाळी ग्रामसभा आहे ह्याच इशयावर. पंचायतीत ये’ अन आला तसा निघुन गेला.
एकंदरीत बंड्याची पद्मश्री ह्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. ह्यात आपण फार नसाव हे पटत होत पण बंड्याच्या भितीने उशीरा ग्रामसभेला गेलो तर सभा संपत आली होती व ठराव वाचन चालले होते. त्या दिवशी ग्रामसभेच्या इतिहासात प्रथमच एकमताने खालील ठराव पास झले होते
१) आरगावचा बंड्या मोकाशी हा पद्मश्री साठी योग्य व्यक्ती असून सरकारने सदर किताब तातडीने मंजुर करावा.
२) बंड्या मोकाशीचे पुर्वज पुण्याच्या गादीशी संबंधीत असल्याने त्याला राजघराण्याचा वारसा असून बंड्या मोकाशी यास ह्यापूढे बंड्या नबाब असे ओळखण्यात येईल.
३) संपुर्ण गाव पंतप्रधान यांना बंड्या नबाब यास पद्मश्री मिळावी यासाठी पत्रे पाठवील, तसेच हे आवाहन परीसरातील सर्व तालमीना करून त्यांचे सहकार्य घेण्यात येईल.
४) गावातील शिष्टमंडळ लोकवर्गणीतून विमानाने दिल्लीला जावून पद्मश्री साठी प्रयत्न करेल.
५) ह्या शिष्टमंडळात पंचायत सदस्य, डेअरीचे संचालक, बचतगट संचालक ई. संस्थांचे संचालक असतील.
६) जवळचे विमानतळ गोव्याला असल्याने शिष्टमंडळातील महिला बंड्या नबाबाचे आजोळकडून कुलदैवत मंगेशी हीला नवस बोलतील.
७) बंड्या नबाब याला पद्मश्री मिळेपर्यंत मन्या हे ग्रामपंचायतीत राहून यंत्रणा राबवतील.
हे ऎकले आणी पुढचे ठराव कानावर आलेच नाहीत. कसाबसा जड पावलांनी घरी पोहचलो, मात्र आजारी असल्याने मला घरातून यंत्रणा राबवण्याची परवानगी मोठ्या मनाने सरपंचानी दिली. दुसऱ्या दिवशी अचानक अनेक सरकारी गाड्या गावात आल्या. सत्ताधारी गटाला शह देण्यासाठी विरोधी गटाने रात्रीतच लाखो एस.एम.एस. करून मागणी केल्याने हा बंड्या नबाब कोण याची चौकशी करण्याकरता अधीकारी आले होते. मात्र गावात एव्हढ सार घडत असताना अचानक जेष्ठ नागरीक गावातून गायब झाले होते. ह्याचा तपास करता कळले की नबाब पुत्राने ताज मध्ये ६४ वर्षाच्या माणसाला मारल्याने बंड्या नबाबही आपल्यावर हल्ला करेल या भितीने ही मंडळी अक्कलकोटी प्रयाण करती झाली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा