दिनांक ३० जानेवारी...........
हल्ली त्याला ते व्यसनच लागले होते,‘साल आपल कोणी ऎकतच नाही’ अस म्हण्ण्याचे दिवस संपले होते. एक इ-मेल आयडी आणी एक पासवर्ड मग तुमच्या भिंतीवर तुम्ही काही लिहा, राजासारखे. बर तुम्ही जे काही लिहणार ते तुमच्या मित्रांना कळणारच आणी नाइलाजाने का होइना ते वाचणारच. नुकतीच माघी गणेश जयंतीला त्याने आठ-दहा आध्यात्मिक ओळी टाइप करुन अपलोड केल्या होत्या. त्याला मिळालेल्या मित्रमंडळाच्या प्रतिसादाने तो भारावुन गेला होता.ह्याच धुंदीत कॅलेंडर चाळत असताना त्याच्या लक्षात आले‘ बापुंची पुण्यतीथी जवळ आली होती’ फक्त ३ दिवस, काहीही करुन त्या दिवशी वॉलवर इंप्रेसिव्ह लीहायलाच हवे. आपण मुंबईत रहात नसल्याचा त्याला आज प्रचंड खेद झाला. नाहीतर आपणही मुन्नाभाईसारख वाचनालयात गेलो असतो. नाहीतर आपणही मुन्नाभाईसारखे वाचनालयात गेलो असतो, धुळ झटकत तिथली पुस्तके चाळली असती, आपल्यालाही लायब्ररीयनच्या चेहऱ्यावर कॄतकॄत्यतेचे भाव दिसले असते आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी जागुन आपल्यालाही चहा पाजला असता.हे सर्व चुकल्याची हळहळ बाजुला ठेवून त्याने गुगल सर्चवर मराठी ऑप्शन घेतला व राष्ट्रपिता, बापु, मोहनदास करमचंद गांधी, स्वदेशी जे जमेल ते टाकून सर्च मारून जमतील तेवढ्या फाईल्स सेव्ह केल्या. आता त्याच्याजवळ माहितीचा प्रचंड खजिना होता. पुढचे दोन दिवस जमेल तेव्हा तेवढा वेळ काढून तो वाचतच राहीला.२९ तारखेला त्याने उत्साहात लिहायला सुरवात केली‘ भ्रष्टाचार व गांधीवादी लढा’ त्याला टायटल सुचले. त्याने मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव केली. पण ज्या गावाने देशाला भ्रष्टाचार विरोधी लढण्याची प्रेरणा दिली, त्याच गावातून निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ राजकीय पक्षाकडून होतो व आपण हे हतबल होवुन बघतो याचे त्याला वाईट वाटले त्याशिवाय हा विषय आता मोर्चा, पुजा-अर्चा आणि चर्चा ह्यातील कशानेही सुटणार नाही हे लक्षात आल्याने त्याने तो स्किप केला.वाचनसमॄद्ध झाल्याने त्याला लगेच दुसरे टायटल सुचले‘मद्यपानं महापापं’ दारुबंदी आणी बापु यावर काही लिहावे म्हणून दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील आपल्या मित्राला त्याने फोन लावला मात्र सॅटर्डे नाईट्च्या मुड्मध्ये तो स्वत:च असल्याने त्याने तो ही विषय बाजुला केला.
मग ‘बापु आणि ग्रामोद्धार’, बापुंचा गॄहस्थाश्रम’ असे एक-एक विषय सुचत गेले व काहीना काही कारणाने बाजुला पडत गेले. शेवटी २९ तारखेला रात्री त्याचा ठाम निच्शय झाला आणि तो समाधानी चेहऱ्याने तो झोपला.
*************************
दि.३१ जानेवारी ००:०३ मिनीटे झालेयत, मी डायरी लिहतोय. कालचा दिवस फारच वेगळा गेला. खुपस वाचल्यावर ठरवल बापुंच्या पुण्यतिथी दिवशी तरी त्यांच्या सारख वागुया. मग त्या दॄष्टीने विचार करायला सुरवात केली. सकाळी उठल्यापासून प्रत्येक कॄतीला त्या साच्यात बसवीण्याचा प्रयत्न करत गेलो, पण कूठचीच त्यात बसेना म्हणून सरळ रजा टाकून घरी राहिलो. जाणीव पुर्वक सगळे कपडे स्वदेशी घातले. भक्तीभावाने वैष्णव जन तो म्हटले. ज्या वॄत्तपत्रांची मालकी परदेशी कंपनीकडे नाही अशी सर्व वॄत्तपत्रे वाचली.स्वत:ची बरीचशी कामे स्वत: केली.कपडे हाताने धुतले.
दुपारच्या वामकुक्षीमध्येही ‘बापुंच्या स्वप्नातला देश’ हेच स्वप्न बघीतले. संध्याकाळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवली.मात्र घरी येताच नेहमी प्रमाणे चिरंजीवानी उलटतपासणी सुरू केली. ‘बाबा आज घरीच का?’ सुटी घ्यायच काही विशेष कारण? राष्टपित्याच्या पुण्यतिथीला चांगला पिता तरी व्हाव या हेतुने न रागावता त्याला सांगीतले ‘आज मी गांधीजींच्या विचाराने वागायचे ठरवले आहे.‘मग त्याचा कामावर न जाण्याशी काय संबंध? अरे बघ मला बस स्टॉपपर्यंत शेअर रिक्शाने जावे लागते, त्यात ४ प्रवासी घेतात, हे नियमबाह्य आहे ना? ‘फादर तुम्हाला बापु कळलेच नाहीत!’ मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहीले तर तो म्हणाला‘अहो बापुंनीच सांगीतलय जे नियम जाचक असतील ते तोडलेच पाहीजेत. अहो पेट्रोल ७० रुपये झालय.मग त्यात तीन प्रवासी नेण त्याला परवडत नाही आणी संपुर्ण भाड देण तिघांना परवडत नाही मग असला जाचक नियम तोडायला नको? आणी फादर एक दिवस लवकर निघुन चालत जायच की? अरे पण बस स्टॉपवर गेल तरी बस थांबतात का? मग अनधीकॄत वाहनातून प्रवास करावा लागतो,आणी मला असे कोणतेही कॄत्य करायचे नव्हते.यावर छ्द्मीपणे हसत तो म्हणाला ‘ जी सरकारी सेवा जनहिताचा अवलंब करीत नाही त्यावर बहीष्कार टाका हेच ना बापुंनी सांगीतलय? तुम्हाला ना!....... जाउदे मला टी.व्ही. बघू दे. तो रिमोट द्या’ आता पर्यंत गप्प बसलेलो मी एकदम जोशात येउन मी म्हटले‘ तो टी.व्ही. लावू नकोस, परदेशी कंपनीचा आहे तो.’ माझ न ऎकताच त्याने टी.व्ही.चा स्विच चालू केला व म्हणाला ‘बाबा कुठच्या जमान्यात जगताय! ९१ सालीच आपण जागतीकिकरणाच्या मसुद्यावर सह्या केल्या आहेत.आता सार जग जणू एक देश झालाय. मग परदेशी ते काय? द्या तो रीमोट!’ नंतर आणखी अवहेलना होऊ नये म्हणुन मी दुसऱ्या खोलीत गेलो. विचार करू लागलो, नी लक्शात आले की विचार करणेही कठीण असते.
मात्र निश्चयाने रात्री १२ पर्यंत जागायचे व लगेच वॉलवर लिहायचे हे ठरविलेच होते. विचारांच्या तंद्रीतून अचानक विचार आला, अरे काम न करताच घरी बसून आपण पगार घेणार हे तरी बापुंच्या तत्वात कुठे बसते. शेवटी ह्या सर्वावर उपाय म्हणुन आजची रजा बिनपगारी व्हावी म्हणून अर्ज लिहायला घेतला पण तो अर्धवट राहिला कारण तो पर्यंत रात्रीचे १२ वाजले होते, आणि ३१ जानेवारी सूरु झाला होता. बापरे डायरीत बरेच लिहले की! आता वॉलवर लिहुया ‘सॉरी फ्रेंड्स, तांत्रीक अडचणीमुळॆ काल संपर्क ठेवता आला नाही. शुभरात्र!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा