आज २७/०९ जागतिक
पर्यटन दिवस. रोजच्या धकाधकीच्या
दिनचर्येतुन पुन्हा उल्हसित होण्यासाठी
आपण सारे आवर्जून
कुठे ना कुठे
फिरून येतोच. ह्यातून
केवळ आनंद मिळतो
अस नाही तर
नाती ही घट्ट
होतात. पर्यटन हा एक
प्रमुख उद्योग म्हणून विकसित
होत असल्यामुळे ग्राहकांच्या
गरजा लक्षात घेत
पर्यटन स्थळांचा विकास होत
आहे. मनोरंजन, निवास,आहार यांच्या
उत्तमोत्तम सुविधा उपलब्ध होत
असताना पर्यटनाच्या नावाखाली काही
अपप्रवृत्ती निर्माण होत आहेत.
पर्यावरणाचा अनिर्बंध ह्रास करत
पर्यटन स्थळांचा विकास होताना
दिसत आहे. उत्तराखंड
मध्ये घडलेल्या आपत्तीमध्ये
नैसर्गिक कारणांसोबत ह्या घटकाचा
ही फार मोठा
दुष्परिणाम आपण अनुभवला
आहे.पर्यटन स्थळांचा
विकास करताना पर्यावरणाची
हानी होणार नाही
याची काळजी घेणे
आवश्यक आहे. यासाठी
स्थानिक नागरिकांबरोबर पर्यटक यांनीही जागरूक
असणे महत्वाचे आहे.
पर्यटन निव्वळ मनोरंजना
पुरते मर्यादित न
ठेवता त्याकडे थोड्या
वेगळ्या प्रकारे पाहता येवू
शकते. पर्यटनामध्ये मोठा
हिस्सा एकतर तीर्थक्षेत्रे,
धर्मस्थळे ह्यांचा असतो अथवा
नैसर्गिक दृष्ट्या वैविध्य असलेली
ठिकाणे ,ऐतिहासिक स्थळे ह्यांचा
असतो मात्र याच
बरोबर सामाजिक जाणीव
जागृत करणा ऱ्या
अनेक सामाजिक संस्था
कार्यरत आहेत ह्यांनाही
भेटी दिल्यास समाजातील
अनेक घटक , त्यांच्या
समस्या व त्यांची
सोडवणूक करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या
अनेकाना मानसिक बळ मिळेलच
पण त्याचबरोबर समाजभान
जागृत होण्यास मदत
होईल हे निश्चित
.
याला जोडूनच
कृषी पर्यटन,जल
पर्यटन यांची माहिती घेऊन
कधीतरी ह्यापैकी एखाद्या स्थळाला
भेट दिल्यास पर्यटनाच्या
आनंदा सोबत प्रयोगशील
उपक्रमांची माहिती होवू शकते.
आजकाल व्यवसाय अथवा
नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी
विखुरलेल्या मित्र-मैत्रिणी यांची
गेट टुगेदर होत
असतात, त्यांनीही एकत्रितपणे अशा
ठिकाणाला भेट दिल्यास
पुनर्भेटीच्या आनंदा सोबत सामाजिक
जाणीवेची जोड देता
येईल.
मित्रानो फिरता फिरता
थोड समाजभान जागृत
होण्यासाठी ह्या पर्यटन
दिनाच्या आपणा सार्यांना
हार्दिक शुभेत्छा -----
काही सहज
भेटी देता येतील
अशा संस्था ( कृपया
आपल्या माहितीतील संस्था यात
जोडा )
१) मातृमन्दीर
, देवरुख
( अनाथ मुलींचे
वसतिगृह ,गोकुळ , सुसज्ज दवाखाना,ITI
, शेती फार्म , शेतकी विद्यालय
दूरध्वनी : ०२३५४ - २४००७८
२) श्रमिक
सहयोग
शिक्षणापासून वंचित आदिवासी व
भटक्या समाजातील मुलांसाठी उपक्रमशील
शाळा
(प्रयोगभूमी) कोळकेवाडी ,ता
चिपळूण जी . रत्नागिरी
३) माहेर
,खेडशी रत्नागिरी
४) साने
गुरुजी राष्ट्रीय स्मारक ,वडघर
ता माणगाव जी.
रायगड (NH 17 जवळ )
५) गणेश
अग्रो टुरिझम नाटे
ता राजापूर जी . रत्नागिरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा