दहावीचा रिझल्ट सायकलवरुन घाई
घाईने घेवून जाताना
दिसली त्यानंतर
अचानक आज इतक्या
वर्षानंतर दत्त म्हणून
समोर उभी राहिली
ती ही दत्त
जयंतीला .
वर्ष अनेक निघून
गेली असली तरी
आम्ही एकमेकाना ओळखलेच.
बरीच बदलली होती
तरी डोळे
मात्र
तसेच ....व्यक्त करण्यासाठी शब्द,
ध्वनी ,हावभाव आणखी कशाचीही
आवश्यकता नाही.तिनेही
एक पेपर घेतला
,घेता घेता म्हणाली
'कसा आहेस ?'
मी
तिच्याकडे बघत म्हटले
'तुझ्या सारखाच ,सुखवस्तू !'
' बदलला नाहीस !' तुला सरळ
बोलताच येत नाही
का रे ?
हसली पण डोळ्यातून
सार काही सांगून
गेली .
त्यावेळी नुकतेच आमच्या गावामध्ये व्हिडीओ
सेंटर वरती चित्रपट
दाखवणे सुरु झाले
होते ,प्रत्येक
चित्रपटातील नायिके मध्ये आणि
तिच्या मध्ये साम्य वाटायचं.
जवळचा रस्ता असला
तरीही अनेक सायकली
शाळेत येताना आणी
जाताना व्हाया तिची गल्ली
.....
विशू कसा आहे
? अपेक्षित प्रश्न अखेर आलाच.
'नाही ग ,कित्येक
वर्षात मला भेटलाच
नाही'.
(म्हणजे आजही सवय
गेली न्हवती ,त्याची
चौकशी करायची म्हणून
तू कसा आहेस
काय ?)
'खोट बोलू नकोस,
फेसबुकवर तुमचा फोटो बघितला',
'छान! मस्त मजेत
आहे ! तू पण
फेसबुकवर ?'
'मी त्याचा फोटो बघितलाय
, काय अवस्था करून
ठेवलेय स्वतःची '?
पुन्हा डोळे बोलले
,दिसत न्हवते तरी
खाली पडणाऱ्या भावाबिंदुद्वारे
.......
'आधी कसा होता
? दूर गेल्यासारखा वाटतो'....
'जशी तू अचानक
निघून गेलीस' ....................
काहीच न बोलता
ती हळू हळू
दुकानापासून बाजूला निघाली ,
'सगळ मलाही समजायच्या आत
घडल रे ! दहावीची
परीक्षा झाली अन
सुट्टीमध्ये गावाला गेले .
भावंडांबरोबर
खेळण्यात मजेत दिवस
जात होते ,एक
दिवस मामा आम्हाला
घेवून त्यांच्याकडे आला,
वाटेत आई म्हणाली
मुलगा बोटीवर असतो
,नात्यातला आहे ,नको
म्हणू नकोस . काहीच
कळत न्हवत . मला
काही विचारायच्या आत
हातात पेढे देत
मामा म्हणाला नमस्कार
कर .....
आता माझी मुलगी
जेवण आवडल नाही
तरी फेसबुकवर शेअर
करते पण एव्हड सगळ घडत
असताना मी कुणाशीच
बोलू शकत न्हवते
.............
आणि सुख काय,
असेल त्यात मानायचं
असत , एकत्र कुटुंब,
प्रत्येकाच्या आवडी निवडी
, आजारपण ,मुलांची शिक्षण रोजच
तेच ....हे येतात
तेव्हा फिरतो आम्ही सगळ्याना
घेवून एकतर देवाला
नाहीतर नातेवाइक आहेतच '....
'जावू दे ! शाळेत
असताना एकदा विशूने
सायकल दुरुस्त करून
दिली होती. ',नको
असलेला चेनचा दुवा काढून टाकलाय
आता व्यवस्थित पळेल
' एव्हडच म्हणत लाजत निघून
गेला होता.
'आता त्याला माझा निरोप
दे ,' नको असलेला
दुवा काढून टाक
, सगळ व्यवस्थित चालायला
लागेल '
हातातला पेपर घडी
घालून घालून चुरगळून
गेला होता .
'ममा आजोबा वाट बघतायत चल लवकर ......
हि माझी मुलगी
,एस वायला आहे , हे
शाळेत माझ्या वर्गात
होते '
हाय ! ममा चलूया!
'प्लीज माझा तेव्हडा
निरोप दे ! वाट
बघतेय चांगल्या फोटोची'
.......
आपल्या मुलीच्या खांद्यावर हात
ठेवत निघून गेली
.
मी मात्र फेसबुकवर जायला
घाबरू लागलोय , तो विशू
बरोबरचा आमचा शेवटचा
फोटो होता , हायवेवरच्या
बस शेडमध्ये एकदिवस
तो आम्हाला मिळाला
पण चेतना हरवलेला
.........
तिला सांगू ही शकलो
नाही विशुला चेनचा
दुवा जोडता येत
होता पण भावनांचा
त्याला
कधी जोडताच आला
नाही तो तुटला
तो कायमचाच .....................
. ..........................................................................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा