(The Tears of The Mystic Rose ह्या ओशो रजनीश ह्यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न करत आहे . )
पाळण्यापासून स्मशानापर्यंत माणूस स्वतःहून धावतोय, एका धुंदी मध्ये आयुष्य व्यतीत करतोय.
ह्या वेगवान स्पर्धेच्या युगामध्ये जन्माला आल्या आल्या आपल्याला ढकलून दिल जात एका अंतहीन शर्यती मध्ये, शिक्षण ह्या आकृती बंधा मार्फत ---------------
४ -५ -नर्सरी, ६ ते १६ -शाळा , १५ ते २० -कॉलेज आणि २१ ते २३ - उच्च शिक्षण ---तारुण्या पर्यंतचा सर्व प्रवास बंदिस्त. संपूर्ण
शिक्षण व्यवस्था दोषपूर्ण . निसर्ग आणि निरागसता विरोधी, पण अगतिक बालकाजवळ कोणताही दुसरा पर्याय नाही. त्याला तेच करायला पाहिजे जे आम्हाला हव आहे.
नर्सरीच्या पहिल्या दिवसापासून शिकवली जाते स्पर्धा आणि त्यासाठी आवश्यक आक्रमकता. अर्थात हे स्वाभाविक आहे ,कोणत्या आई -वडिलाना आपले मुल इतरांपेक्षा मागे राहिलेले आवडेल ? प्रत्येक पालकाला वाटते आपले मुल सर्वोत्तम व्हावे . सर्वात प्रथम,सर्वांच्या पुढे पण हे अशक्य आहे . वर्गातील सर्व मुल प्रथम नाही येवू शकत पण सारी धडपड त्याच्यासाठी. गणिताचा हा नियम बिचाऱ्या अल्बर्ट आईनस्टाइन यालाही हरवणारा.
कोणीतरी एकच प्रथम येवू शकतो,एकटाच दुसरा किंवा तिसरा पण कोणाला तिसऱ्या क्रमांकावर रहाणे आवडेल ? आहे कोणी अस ? कोणत्या मुलाच शेवटच्या क्रमांकावर रहाण्या बद्दल अभिनंदन केल जात?
शिक्षण व्यवस्था फक्त स्मरणशक्तीची परीक्षा घेते बुद्धीची नाही .
निर्दोष मुलाला शिकवलं जात -- महान सिकंदर , तैमूरलंग, इवान , हिटलर यांच्याबद्दल
आणि त्याचबरोबर महान युद्धे व विश्वयुद्ध. फक्त विनाश आणी विनाश -----
महान सिकंदराकडे अशी कोणती महानता होती?
फक्त जग जिंकण्याची अमर्याद अहंकारी ओढ.
क्रोर्याला महान विजेत्याचे उपोषण देणे बस ----
इतिहास ,
गतकाळाच्या चुकाना गर्वाने आठवणे
भूगोल ,
पृथ्वीचे विविध देशांमध्ये विभाजन
जीव विज्ञान ,
सर्व गोष्टींचे सर्वंकष ज्ञान फक्त स्वतःबद्दल शुन्य
आणि प्रकृतीमधील आपल्या स्थानाला सोडून
गणित ,
एक अधिक एक ,दोन पण प्रत्यक्ष आयुष्याच्या गणितामध्ये गैरलागू
भाषा ,
फक्त शब्द आणि वाक्य पण निःशब्द मौनाची भाषा शिकवली जात नाही
पूर्ण शिक्षण व्यवस्था चुकीच्या आधारस्तंभावर उभी केली गेली आहे .
सर्व विषय, अभ्यासक्रम आणी परीक्षा पद्धतीही ----
वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेली लाखो मुले पण एकाच साच्यामध्ये बसविण्याचा अट्टाहास .
सर्व मुल एकसारखी जणू काही एखादा प्ल्यास्टीकचा कारखाना खेळणी बनवत आहे. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरील हास्य सुद्धा सारखं जणू बार्बी ---------------
आम्ही एका नियंत्रित समाजाकरता रोबो बनवतोय असे रोबो जे आमच्या समाजव्यवस्थेमध्ये सहज एकरूप होतील.
कोणतेही मुल स्वतःवर प्रेम करताना दिसत नाही, कारण ते जाणून असते शांत क्षणी विचार करताना अथवा स्वतःशीच संवाद साधताना की त्याला या शिक्षण व्यवस्थेने पूर्ण घेरलेले आहे. आपली सगळी ताकद परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी आणि अनावश्यक गोष्टींचा भरणा करण्यात खर्च होतेय. चांगली नोकरी मिळवण्यासाठी इच्छा नसतानाही तेच तेच पाठांतर करत राहणे आणि जास्तीत जास्त प्रमाणपत्र गोळा करत पळणे.
प्रत्येक मुलाला पुन्हा पुन्हा बिंबवल जात की ते अज्ञानी आहे .
पुन्हा पुन्हा समजावून सांगितली जाते शिक्षणाची गरज ---
प्रत्येक मुलाला समजावलं जात की तू आत्ता आहेस तो आदर्श नाहीये ,तुला योग्यता तेव्हाच मिळेल जेव्हा तू आम्ही सांगू तसे प्रयत्न करशील,संघर्ष करशील -----
बालपणीच मग स्पर्धा, डावपेच आणी खोट हास्य त्याच्या सवयीच होत. आपले सर्वात लाडके आई- वडील , शिक्षक, समाज आणि देश यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत हे लक्षात येताच ते मुल स्वतःचा तिरस्कार करू लागत, स्वेच्छेच्या विरुद्ध प्रवाहित करणाऱ्या प्रत्येक घटकाचा ते तिरस्कार करू लागत.
तरीही सर्वत्र हास्य आहे. जिमी कार्टरच हास्य, कारण तुला इच्छा नसली तरी हसायचं आहे , ह्या हसण्यानेच बरीच कामे करून घेता येतात ना ?
कोणतेही मुल स्वतः आहोत तसे स्वतःला स्विकारताना दिसत नाही. स्वीकारणार तरी कसे? चारही बाजूनी निरर्थक कारणानी त्याला झिडकारल जातंय. अशी कारण जी आम्हा मोठ्याना गंभीर आणि महत्वपूर्ण वाटतात. रडू नका, समाजासाठी जगा, दुसऱ्यांसाठी जगा, स्वतःचे बलिदान करा, लढायला जा, आपल्या देशासाठी लढा.
कोणतेही मुल निसर्गानुरूप वाढूच शकत नाही. त्यान कोणासारखं तरी होण गरजेच आही. शक्तीशाली राष्ट्रपतींसारख किंवा एखाद्या प्रसिद्ध डॉक्टर सारख अथवा एखाद्या महत्वाच्या पदावरील सरकारी अधिकाऱ्यासारख किंवा आणी कोणीतरी पण स्वतःसारख नाही. कुठलीतरी प्रतिमा प्रक्षेपित करूनच त्याला बनायचं आहे.
जीवनाचा हा पहिला धडाच निरर्थक आहे.
स्वतःवर प्रेम करा --स्वतःचा स्वीकार करा - स्वतःसारखे व्हा
स्वतःवर प्रेम करा --
स्वतःवर प्रेम न करून तुम्ही उर्जाक्षय करत आहात. प्रथम स्वतःवर प्रेम करण्यास शिका. जो स्वतःवर प्रेम करतो त्यालाच आंतरिक शुद्ध प्रेमाची किमत कळते.
स्वतःचा स्वीकार करा ---
किती अनैसर्गिक वातावरणामध्ये आपण राहणार आहोत,जर चारही बाजूला एक सारखे एक मुखवटे असतील.
स्वतःचा स्वीकार करण्यास शिकूया. जसे आहोत तसे. सृष्टीने तुम्हाला जन्म दिला आहे आणि विना अट स्वीकारलं आहे. तुम्ही तिच्या प्राणवायूने जिवंत आहात. तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये ती सामावली आहे, आणि हा निसर्गदत्त चमत्कार आहे. प्रत्येक व्यक्ती अनुपम आहे, वेगळी आहे, ह्या अपार ब्रन्म्हाडामध्ये अद्वितीय. तुमच्या सुन्दरतेमध्येच त्याची सर्वोत्तम निर्मिती दडलेली आहे.
स्वतःसारखे व्हा ----
जेव्हढा समाजाच्या अपेक्षांचा पाठलाग कराल तेव्हढ अपेक्षांचं ओझ वाढत जाइल व ते पूर्ण करण्यासाठी वाढत जाइल प्रयत्नांची पराकाष्ठा. ह्यातून फक्त ढोंगी जीवन जगू शकाल. मात्र स्वतःसारखे व्हा. शांत व्हा. तुम्ही सुंदर व्हाल.
स्वतःवर प्रेम करा. स्वतःचा स्वीकार करा. स्वतःसारखे व्हा.
हा गुण तुम्हाला घेऊन जाइल परिपूर्णतेकडे. एक व्यक्ती जिचा आंतराग्नी कायम प्रज्वलित असेल. विशाल उर्जा एकत्र येईल आणि तुम्हाला व्यापून टाकेल. तुमच्या मध्ये आंतर्विश्वास निर्माण होईल, जो तुमच्यातील संवेदिनशीलता जागृत करेल. आन्तरात्म्याशी एकरूप व्हा व आपली आंतरिक चेतना जागृत करा मग ती कितीही छोटी असो. कोणत्याही गुरूकडून अथवा शिक्षका कडून उधार घेऊ नका. ते तुम्हाला काही देवू शकत नाहीत.
तुमच जीवनच तुम्हाला अंतरन्गामधील मंदिरातील दिवा प्रज्वलित करण्यास मदत करील जिथे तुमच्या शिवाय दुसर कोणी पोहोचू शकत नाही. हे अस मंदिर आहे जिथे तुम्ही स्वतःच गुरु असाल.
एक सच्चा गुरु जास्तीत जास्त तुम्हाला प्रेरणा देवू शकेल, तुमच्या आत्म्याशी एकरूप करण्यासाठी ----
एका परिपूर्ण व्यक्तीत्वाकडून आपण जातो सामाजिक जाणिवेकडे आणि नंतर वैश्विक जाणिवेकडे.
प्रवास अगदी साधा आणि सरळ आहे. विभाजित व्यक्तीमत्वाकडून परिपूर्ण व्यक्तित्व ते ब्रम्हांड.
जीवन जगा - जीवनावर प्रेम करा -जीवनाचा हसत हसत स्वीकार करा.
हे जीवन तुमच्यातील अस्तित्वाचा उत्सव आहे. हा जीवनोत्सव तुमचा आत्मा आहे जो तुम्हाला संमेलीत करतो सृष्टीच्या नृत्यामध्ये. तुमचा शोध सुरु करण्यापूर्वी अंतरंगातील आकाशामध्ये डोकावून पहा. पुन्हा शोधा जे पहिल्यापासून तुमच्या जवळ आहे.
तुम्ही ह्या सृष्टीच्या परम अभिव्यक्ती आहात.
सर्व विश्व तुमच्यामध्ये सामावले आहे. माणूस एक सूक्ष्म ब्रम्हांड आहे. प्रत्येक अणू ज्याने तुम्ही बनला आहात त्याचा उगम ह्या सृष्टीतच आहे. त्याचा प्रवास अखंड चालू आहे. तुम्ही बीज आहात, तुम्हीच अंकुर आणि तुम्हीच पूर्णत्व.
पाचही इंद्रिय ज्यांनी तुम्ही बाहेरील दुनियेचा अनुभव घेता ती बाह्यस्थ आहेत, सहाव इंद्रिय तुमच्या अंतरीच्या आकाशाचे दार उघडत.
अंतरीचे आकाश जे बाहेरील आकाशापेक्षा अपार आहे, कारण आता अनुभव घेणाराच अनुभूती होत आहे. शिक्षणाचा खरा अर्थ अंतरंगातील अनुभूतींचा शोध घेणे.
विज्ञान शोध घेत बाहेरील जगाचा त्यासाठी उपयोगात आणत आपली पंचेंद्रिय.
ध्यान शोध घेत अंतरंगाचा आपल्या सहाव्या इन्द्रियाचा आधार घेत.
वैद्न्यानिक बाहेरील जगाचा शोध घेतायत जिथे माहितीचा साठा हिच पुंजी आहे.
ध्यानस्थ शोध घेतात अंतरंगातील अनुभूतींचा ,शुद्धतेचा.
आता निरर्थक शिक्षण पूर्ण झाले आहे व वेळ झाली आहे आतापर्यंत झालेल्या गुंतवणुकीची परतफेड करून घेण्याची.
वय वर्षे २१ ते २४ - नोकरी मिळवायची आहे , पैसा कमवायचा आहे आणि एक मित्र किंवा मैत्रिण सुद्धा.
वय वर्षे २५ ते ३२ - लग्न, संसार आणी मुल
वय वर्षे ३३ ते ४० - मुलांच्या वाढत्या वयाबरोबर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या
वय वर्षे ४१ते४५ - जीवन म्हणजे काय ?
वय वर्षे ४६ते४९ - समज वाढू लागली आहे
वय वर्षे ५१ ते ६० - सगळच निरर्थक होत पण आता एक पाय स्मशानात.
राम
नाम
सत्य है -----स्वर्गातील देवदूत स्वागत गीत गात आहेत,अंतिम पल्ला दिसू लागला आहे.
एक अनिवार्य जीवन पद्धती. ह्या सुव्यवस्थित समाजाला पूरक होण्यासाठी त्यांनी एक सशक्त बालकाला जन्म देणारा जीव शोधून काढला आहे, जो आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल आणि मुलांवर उत्तरदायित्व सोडून निघून जाइल पुन्हा समाजव्यवस्था टिकवण्यासाठी .
परिवार दोषी आहे शत्रुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी. तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस , तू माझ रक्त आहेस, हि दुसऱ्याची मुल आहेत-दुसऱ्याच रक्त. इथेच देशाच विभाजन सुरु होत. मुल विभाजित,परिवार विभाजित,शेजार विभाजित,राज्य विभाजित आणि धर्म विभाजित.
आई- वडीलमुलाना विभाजित करतात परिवारामध्ये , राजनीती पृथ्वीला वाटते अनेक हिस्स्यांमध्ये, देशांमध्ये अन धर्म वाटण्या करतो काल्पनिक आकाशाच्या आणि परलोकाच्या.
पूर्ण दुनिया विभक्त
तरीही शिकवलं जातंय -प्रेम करा,प्रेम हाच एक दुवा.
एक महान ढोंग ----------------------------------