काही वर्षे झाली मी त्यांच्याकडे गेलो न्हवतो. काही दिवसांपूर्वी
रत्नागिरीला जाताना माझ्या गाडीपुढे एक टेम्पो होता त्यावर लिहिले होते
गणपतीची गाडी, बाप्पा पेणहुन निघाले होते .तो टेम्पो बघितला व ठरवले या
वर्षी त्यांच्याकडे जायचेच.
दुसऱ्या दिवशी दुकानाजवळ गेलो, रत्नागिरी बाजारपेठेच्या मुख्य नाक्यावर त्यांचं दुकान, दुकानांमध्ये ते दिसले नाहीत .मला वाटले बऱ्याच वर्षांनी आल्याने कदाचित मी चुकलो असेंन म्हणून दुकानाची पाटी बघितली, नाव तेच होत फक्त कालानुरूप बदल होत फ्लेक्सचा बोर्ड होता व सोबत मोबाइल नंबर. दुकानात एक युवक तन्मयतेने मंगळसूत्र गुंफत होता . समोर बसलेल्या गृहिणी सांगतील तसे मणी तो गुंफित होता, मी थांबून राहिलो, त्या गेल्यावर मी चौकशी केली ,नेहमी दुकानात असतात ते चाचा कुठे आहेत .मला त्यांच्याशी अनंताबद्दल थोडं बोलायचं आहे.तुम्हाला पूजेबद्दल माहिती हवी असेल तर पुजारी गुरुजींना विचारा तो म्हणाला . मी म्हटलं नाही मला चाचांशी ते अनंत कसे बनवतात त्याबद्दल बोलायचं आहे . हसत हसत तो म्हणाला ते दुपारी येतात ,मी त्याला दुसऱ्यादिवशी येतो सांगून घरी गेलो
लहानपणापासून पासून मी बाबांबरोबर किंवा कधी कधी एकटा त्यांच्या दुकानात जात असे.कधी मोठा भाऊ घेऊन ठेवायचा पण गणपती जवळ आले की घरी अनंत आणून ठेवायचा हे ठरलेलं . अनंत चतुर्दशीला ह्याची पूजा केली जाते ,वर्षानुवर्षे हे चालु आहे . दुसऱ्यादिवशी दुपारी माझे मित्र वल्लभ वणजु यांना घेऊन गेलो , चाचा दुकानात छत्री दुरुस्त करत बसले होते , दुकान आतून तसेच होते जसे मी लहानपणापासून पाहात आलो होतो . पूर्वी स्टोव्ह दुरुस्तीचे सामान जास्त असायचे .खूप मोकळेपणाने ते बोलू लागले, दुकानात बसलेला तो हसऱ्या चेहऱ्याचा युवक त्यांचा मुलगा अफझल, चाचांच नाव अल्ली अब्दुल रहीम पटवी , अफझल ही त्यांची चौथी पिढी.देवाचे दागिने, मंगळसूत्र , गणपतीचे गोंडे , पुतळ्या हे बनवणारे म्हणून त्यांचं आडनाव पटवी . अफझल खर तर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेला ,त्याला बोटीवर किंवा आखाती देशात सहज नोकरी मिळाली असती, त्याचे समवयस्क जसे नोकरीसाठी आहेत तसे जाता आले असते पण ही पारंपारिक कला शिकून घेत तो स्वतः आज हा व्यवसाय चाचाना मदत करत चालवत आहे.
चाचा सांगत होते ,पूजेसाठी बनवण्यात येणारा अनंत म्हणजे अनंत व अनंती अशी जोडी असते, तो पूर्ण रेशमाच्या धाग्यापासून विणला जातो .एक अनंत करायला साधारण 2 तास लागतात .एव्हड नाजूक काम असलेल्या अनंताची किंमत किती हे मी विचारल्यावर ते हसत म्हणाले 30 रुपये फक्त , हे मो परवडत म्हणून करत नाही तर एक परंपारा म्हणून आम्ही करतो, खूप नाजूक काम असल्याने ते शांतपणे घरी करावे लागते, आजूबाजूच्या 40 कि मी परिघातील हे व्रत करणारे त्यांच्याकडून अनंत घेऊन जातात व ते करून ठेवणार या खात्रीने येत असतात. साधारण 50 ते 60 घरांमध्ये चाचानी केलेले अनंत श्रद्धेने पुजले जातात. आजकालच्या मुलांना माहित नसल्याने अनंताला असलेल्या 14 गाठी चाचा तो बांधून देताना प्रत्येकाला मोजून बघायला सांगतात.
कालानुरूप बदलत आता जोडीला छत्रि दुरुस्ती सारखे जोड धंदा करत पिढ्यानपिढ्याची कला संवर्धन करणाऱ्या अफझलला व चाचाना सलाम !
इदीचा शिरकुर्मा हा आमच्यासाठी प्रसाद असतो व चाचानी गुंफलेला रेशमी धागा आमच्यासाठी अनंत असतो हीच खरी आमची संस्कृती आहे . सणातून स्नेह व बंधुत्व वृद्धिंगत होवो हीच प्रार्थना .....